पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या नेत्र रुग्णालयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन


पुणे :   पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नेत्र उपचारासाठी उभारलेल्या समर्पित रुग्णालयामुळे नागरिकांना नेत्र उपचाराच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून सर्व घटकातील नागरिकांना या सेवा निश्चितपणे उपयुक्त ठरतील, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या शंकरराव मासुळकर अर्बन हेल्थ सेंटर व आय हॉस्पिटलसह विविध प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी आमदार उमा खापरे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, प्रशासक तथा महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, कार्यकारी अभियंता संजय खाबडे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ. रुपाली महेशगौरी आदी उपस्थित होते.

 

महापालिकेने नागरिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानासह अद्ययावत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे. अशा प्रकारच्या सुविधा नागरिकांना नेत्र उपचारासाठी उपयुक्त ठरतील, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील  म्हणाले.

 

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील नेत्ररोग विभाग नूतन नेत्र रुग्णालयात स्थलांतरित होणार असून त्याकरिता ८० खाटांची व्यवस्था तसेच ४ शस्त्रक्रिया विभाग तयार करण्यात आले आहेत. संपूर्ण रुग्णालयासाठी २५ कोटी ४६ लाख रुपये इतका खर्च झालेला आहे. शंकरराव मासुळकर आय हॉस्पिटल हे पदव्युत्तर संस्था वायसीएम रुग्णालयाशी संलग्नित राहणार असल्यामुळे   नेत्ररोगाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्र म्हणूनदेखील उपलब्ध होणार आहे. सामान्य नेत्ररोग निदान आणि शस्त्रक्रिया, काचबिंदू निदान शस्त्रक्रिया, पापण्यांचे आजार, लासरू शस्त्रक्रिया, मधुमेहाच्या रुग्णांसाठी रेटिना तपासणी व उपचार, डोळ्यातील दाब वाढल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवरील उपचार, लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी व बालपणातील अंधत्व याबाबतचे उपचार, दृष्टिहीनांना कमी दृष्टी सहायकाबाबतच्या सुविधा आणि उपचार, डोळ्यांशी संबंधित सामुदायिक जागरूकता तपासणी आणि उपचार या अत्याधुनिक सेवा नेत्र रुग्णालयामध्ये उपलब्ध होणार आहेत.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!