अजित पवारांना मोठा धक्का! जवळच्या सहकाऱ्याचे अपघाती निधन, राजकारणातून हळहळ…

मुंबई : राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तसेच विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिडकर यांचे निधन झाल्याची माहिती आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते जवळचे सहकारी असल्याचे सांगितले जात आहे.

अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन परतत होते. तेव्हा शिवर येथे त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत तपास सुरू आहे.
याबाबत माहिती अशी की, एका पिकअप गाडीने तुकाराम बिडकर यांच्या दुचाकीला धडक दिल्याने तुकाराम बिडकर आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्र राजदत्त मानकर या दोघांना मोठी दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले.

घटनेने त्यांच्या कुटूंबाला एकच धक्का बसला आहे. त्यांच्या मित्राबाबत अद्याप कुठलीही माहिती नाही. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत पोलीस सध्या चौकशी करत आहेत. यामुळे मात्र राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
