शेतकऱ्यांचा मोठा विश्वासघात!! निवडणुकीपूर्वी वीज बिल शून्य, आता भरा थकबाकी, नेमकं प्रकरण काय?


कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची मते घेण्यासाठी एप्रिल ते जून २०२४ अखेरपर्यंतची साडेसात अश्व शक्तीपर्यंतच्या सर्व कृषी पंपधारकांना वीज बिले शासनाने शून्य करून दिली, परंतु आता डिसेंबरपासून पूर्ववत पोकळ थकबाकीसह बिले दिली आहेत. यामुळे याकडे सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

तसेच यामुळे आमची फसवणूक झाल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची मते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक योजना सरकारने सुरू केल्या. याबाबत माहिती अशी की, गेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी साडेसात अश्वशक्तीपर्यंतचे थकीत आणि चालू वीज बिल माफ, अशी घोषणा केली.

नंतर निवडणूक असल्यामुळे याची अंमलबजावणीही सुरू केली. त्यानंतरचे तीन महिन्यांचे कृषी पंपाचे वीज बिल शून्य दिले. कृषी पंपधारक बिलावर थकीत रक्कम नाही, चालू बिलही शून्य आहे, हे पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र पुढे जाऊन असे काही होईल याबाबत शेतकऱ्यांना माहिती नव्हते.

असे असताना महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले. यावेळी देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री झाले आहेत. अर्थमंत्री त्यावेळचेच आहेत. तरीही, कृषी पंपधारकांना वीज बिल थकबाकीसह दिले आहे. यामुळे कृषी पंपधारकांची फसवणूक झाल्याचे अनेकांनी सांगितले. आताचे बिल थकीबाकीसह आले आहे.

त्या बिलावरून मागील बिलावरील फडणवीस, एकनाथ शिंदे अजित पवार यांचे फोटो मात्र गायब आहेत. याबाबत शेतकरी नेते राजू शेट्टी म्हणाले, शासनाने थकबाकीसह बिले पाठवून शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केली आहे. ते असेच करणार याची खात्री होती. वीज कंपनीला आजारी पडून ती अदानीच्या घशात घालण्याचा डाव आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!