राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचं निधन, वयाच्या ८५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..

नवी दिल्ली : राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचं निधन झालं. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांना ब्रेन हॅमरेजमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लखनऊ पीजीआयमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.

आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य प्रदीप दास यांनी सत्येंद्र दास यांच्या निधनाची माहिती दिली. प्रदीप दास यांनी सांगितलं की, प्रदीर्घ आजाराने लखनऊच्या पीजीआयमध्ये सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सत्येंद्र दास यांचे निधन झाले.
त्यांचे पार्थिव पीजीआयमधून अयोध्येत आणलं जाणार आहे. त्यांच्या पार्थिवाला घेऊन शिष्य अयोध्येच्या दिशेने येत आहेत. तर अंत्यसंस्कार १३ फेब्रुवारीला अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर होणार आहेत.

आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य प्रदीप दास यांनी सांगितले की, दीर्घ आजारानंतर सकाळी आठ च्या सुमारास लखनऊच्या पीजीआयमध्ये त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव पीजीआयमधून अयोध्येत आणले जात आहे. शिष्यांनी त्यांचे पार्थिव अयोध्येत नेले आहे.

उद्या, १३ फेब्रुवारीला अयोध्येतील सरयू नदीच्या तीरावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.नुकतेच पीजीआयने एक हेल्थ बुलेटिन जारी केले होते ज्यात सत्येंद्र दास यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारखे गंभीर आजार असल्याचे म्हटले होते.