लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारीचा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार, समोर आली महत्वाची माहिती…

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याचे आवाहन महायुती सरकारने केले होते. दरम्यान, हे २१०० रुपये कधीपासून मिळणार, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. लाडकी बहीण योजनेतून जवळपास ५ लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत. त्या महिलांना आतापासून पैसे मिळणार नाहीत.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाही. परंतु या महिन्याल हप्ता २५ फेब्रुवारीपर्यंत येऊ शकतो.

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येऊ शकतो. मागील ३ महिन्यांपासून हा शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येत आहे. त्यामुळे या महिन्यातदेखील तेव्हाच हप्ता महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो.