वाल्मिक कराडने मला नको त्या ठिकाणी स्पर्श केला, जिल्हाधिकाऱ्यांच्या खोलीत नेलं अन्…; करुणा मुंडेनी केला मोठा गौप्यस्फोट

बीड : काल मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला. तसेच करुणा मुंडे यांचा मोठा विजय झाला. त्यांची मागणी कोर्टाने मान्य केली. मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे. मला पोटगी मिळाली हा माझा विजय आहे. माझी आई नव्हती. मला तुरुंगात टाकल्यापासून माझ्या बहीण आणि भावाने माझा नंबर ब्लॉक केला आहे, अस त्यांनी निकालानंतर सांगितले आहे.
तसेच करूणा मुंडे म्हणाल्या, मी एकटीच लढत आहे. तीन वर्षापासून एकटीच लढत आहे. आई असती तर माझ्यावर ही वेळ कधीच आली नसती. माझ्या मनात आत्महत्येचे विचार येतात. कोर्टाचा निकाल मला मान्य नाही. मी हायकोर्टात जाणार आहे. असं मोठं वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे.
यानंतर त्यांनी वाल्मिक कराडवर देखील गंभीर आरोप केले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मिकने आपल्याला मारहाण केली आणि चुकीचा स्पर्श केला, असं माध्यमांसमोरच करूणा शर्मा म्हणाल्या. बीडच्या तात्कालीन कलेक्टर मुंडे धुमाळ मॅडमची चौकशी करा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
मला १५ लाख रुपये पोटगी हवी आहे. दोन लाखात काय होणार? धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर वाल्मिक कराडने माझ्या कानाखाली मारली. मला चुकीचा स्पर्श केला. मला मारहाण झाली. तेव्हा मी डीजी आणि देवेंद्र फडणवीस यांना अर्ज दिला. मात्र काहीच होत नाही.
मला सीसीटीव्ही फुटेज द्या असं म्हटलं होतं. पण अजून दिले नाही. पण वाल्मिक कराडविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे, असेही करुणा मुंडे यांनी सांगितले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून आता धनंजय मुंडे राजीनामा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.