सनई चौघड्यांच्या सुरात, तुतारी वाजवून पाचशे गाड्यांच्या ताफ्यात नवजात बाळाला आणले घरी, लोणी काळभोरमध्ये लेकीचे अनोखे स्वागत..
![](https://thetime2time.com/wp-content/uploads/2025/02/family.jpg)
लोणी काळभोर : येथील उद्योजक इंद्रजीत अभय काळभोर यांनी आपल्या मुलाच्या जन्माचे स्वागत मराठमोळी संस्कृती जपत सनई चौघाड्यांच्या मंगलमयी सुरात, तुतारी वाजवून फुलांचा वर्षाव, रांगोळ्यांच्या पायघड्या, औक्षण आणि घरावर गुढी उभारून मोठ्या आनंदात केले. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली. यामुळे नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
याबाबत माहिती अशी की, जान्हवी आणि इंद्रजीत यांनी आपल्या बाळाचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यासाठी तयारी केली होती. या स्वागत समारंभात 500 हून अधिक लोक सहभागी झाले होते, ज्यात पाचशे वाहने समाविष्ट होती. इंद्रजीत काळभोर आणि जान्हवी काळभोर यांना नुकतेच पुत्ररत्न प्राप्त झाले, यावेळी त्यांना मोठा आनंद झाला.
दरम्यान, हा ताफा जान्हवी यांच्या माहेरून निघून लोणी काळभोरला जाताना दिसला. ज्यामुळे संपूर्ण मार्गावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. हा आनंद नातेवाईकांनी मिठाई वाटून साजरी केला. नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी घराला सजावट करण्यात आली.
यावेळी अनेकजण उपस्थित होते. स्वागत समारंभात सनई-चौघड्यांच्या मंगलमय सुरांनी वातावरणाला अधिकच आनंदी बनवले. घरात प्रवेश करताना बाळावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर औक्षण करून आणि रांगोळ्यांच्या पायघड्या घालून त्याचे स्वागत करण्यात आले. यामुळे याची मोठी चर्चा झाली.
यानिमित्ताने घरावर गुढी उभारण्यात आली होती. अशा प्रकारे मराठी संस्कृतीनुसार नवजात बाळाचे स्वागत खूपच अनोखे बनले. याचे फोटो आणि विडिओ देखील व्हायरल झाले आहेत. यामुळे या स्वागताची पुण्यात जोरदार चर्चा रंगली आहे.