‘घोडगंगा’ कारखान्यावर अशोक पवार यांच्यानंतर सत्ता गाजविण्याचे स्वप्न श्रणभंगूर होणार! शिरुरच्या दादा पाटील, सुधीर फराटे हे पाच वर्ष सहकारात निवडणूक लढविण्यास अपात्र …!!


शिरूर : तालुक्यातील बडे नेते दादा पाटील फराटे व सुधीर फराटे यांना उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्यांना पुढील पाच वर्ष सहकारातील कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही, तसेच स्वीकृत सदस्य म्हणून देखील कोणत्याही संस्थेवर सदस्य म्हणून नियुक्त होत येणार नाही. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

त्या निकालविरोधात दोघेही उच्च न्यायालयात गेले होते. नंतर उच्च न्यायालयानेही विभागीय सहनिबंधकाचा निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळे शिरूरमध्ये अजितदादा गटाला मोठा धक्का मानला जात आहे. येणाऱ्या काळात याबाबत अजून काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद बॅंकेच्या थकबाकीमुळे या दोन्ही नेत्यांना पुढील पाच वर्षांत सहकार क्षेत्रातील कोणतीही निवडणूक लढविता येणार नाही.

या निर्णयामुळे या दोन नेत्यांचे सहकारातील अस्तित्व धोक्यात येऊ शकते. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील मांडवगण फराटा येथील विविध कार्यकारी सोसायटीचे दादा पाटील फराटे आणि सुधीर फराटे हे २०१८ मध्ये संचालक होते. त्यावेळी दादा पाटील फराटे यांच्याकडे १८ लाख ७३ हजार १६३ रुपये, तर सुधीर फराटे यांच्याकडे १४ लाख ७ हजार ७४८ रुपयांची शरद बॅंक आणि मांडगवण फराटा सोसायटीचे थकबाकीदार होते.

यामुळे त्यांचे सोसायटीचे संचालकपद रद्द करण्यात यावे, यासाठी सोसाटीचे अध्यक्ष महादेव किसनराव फराटे आणि उपाध्यक्ष राजाराम विश्वनाथ शितोळे यांनी शिरूर सहायक निबंधकांकडे तक्रार केली होती. याबाबत दादा पाटील आणि सुधीर फराटे यांच्या बाजूने निकाल लागला होता.

नंतर या निकालाच्या विरोधात महादेव फराटे आणि राजाराम शितोळे यांनी पुण्यात विभागीय सहनिबंधकांकडे अपील केली. यावर विभागीय सहनिबंधकांनी ४ मार्च २०२१ रोजी दादा पाटील फराटे आणि सुधीर फराटे यांना पुढील पाच वर्षांसाठी सहकारातील कोणत्याही निवडणुका लढविण्यावर बंदी घालण्यात आली.

नंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. याबाबत आता हा निकाल आला आहे. उच्च न्यायालयाने विभागीय सहनिबंधकाचा निर्णय कायम ठेवत दादा पाटील फराटे आणि सुधीर फराटे यांना पाच वर्षांसाठी सहकारातील निवडणुका लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!