बिहारवर विशेष लक्ष! विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवत घोषणांचा पाऊस, नेमक्या कोणत्या केल्या घोषणा?

नवी दिल्ली : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारकडून बिहारसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये मोदी सरकारने मुख्यमंत्री नितीशकुमार यांना खूश करतानाच मतांसाठीची पेरणीही केली आहे.

बिहार राज्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बिहारमध्ये ग्रीनफिल्ड विमानतळ बांधणार आहेत. पटना विमानतळाचा विस्तारही करण्याची घोषणा सीतारामण यांनी केली आहे. मिथिलांचलमधील ‘वेस्टर्न कॉस्ट कॅनॉल’ प्रकल्पाचाही त्यात समावेश आहे. मखाना बोर्ड आणि पटना आयआयटीचा विस्तार या प्रमुख घोषणांचा समावेश आहे.
यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय होणार हे बघणे महत्वाचं ठरणार आहे. यामध्ये आयआयटीची क्षमता वाढविण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. देशातील पाच आयआयटीमध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असेही सीतारामन यांनी सांगितले.

पटना आयआयटीचा विस्तार करण्याची घोषणाही सीतारामन यांनी केली आहे. तसेच राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था स्थापन करण्यात येणार आहे. ही संस्था संपूर्ण पूर्व भागातील अन्न प्रक्रिया उपक्रमांना बळकट करेल, असेही त्यांनी सांगितले आहे.
या संस्थेच्या माध्यमातून शेतकरी त्यांच्या उत्पादनाचा दर्जा सुधारून त्यांचे उत्पन्न वाढवतील. या संस्थेमुळे युवकांना कौशल्य, उद्योजकता आणि रोजगार मिळण्याच्या संधी निर्माण होणार आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.