स्वत: संन्यासी बनून बिझनेस केला अन्…, ममता कुलकर्णीवर टीका करणाऱ्या बाबा रामदेव यांना राखी सावंतचं उत्तर


मुंबई : योगगुरू बाबा रामदेव यांनी अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या संन्यास घेण्यावरून टीका केली. एका दिवसात कोणी साधूसंत बनत नाही, असं ते म्हणाले. त्यावरून आता अभिनेत्री राखी सावंतने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाली राखी सावंत?

बाबा रामदेव यांनी अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या महामंडलेश्वर बनण्यावरून आक्षेप घेतला आहे. ममताने नव्वदच्या दशकात मोठमोठ्या चित्रपटांमध्ये काम केलंय. आता तिच्या संन्यास घेण्यावरून बाबा रामदेव यांनी अभद्र शब्द वापरले आहेत. जी मुलगी बॉलिवूडमधून आली, ग्लॅमर वर्ल्डमध्ये राहिली, ती संन्यासी बनू शकत नाही, असं ते म्हणाले. मी त्यांना बोलू इच्छिते की, बाबा रामदेवजी.. तुम्ही तर संन्यासी असून बिझनेस केला.

मार्केटमध्ये तुम्ही तेल, बिस्किटपासून अशा अशा गोष्टी विकल्या आहेत, हे लज्जास्पद आहे. भगवे कपडे घातल्याने कोणी साधू बनत नाही. तुम्ही लोकांना चुना लावला आहे. त्यामुळे ममता कुलकर्णीबद्दल तुम्ही काही न बोललेलंच बरं आहे”, असं राखी म्हणाली.

ममता कुलकर्णीची बाजू कोणी नाही घेतली तरी मी तिच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. २५ वर्षांनंतर ती भारतात आली आणि कुंभमेळ्यात रडत-रडत तिने संन्यास घेतला. तिचं तुम्ही कौतुक केलं पाहिजे. पण तुम्हाला तिच्याबद्दल ईर्षा वाटू लागली आहे. एक मुलगी या संसाराचा, तोकड्या कपड्यांचा, अश्लीलतेला त्याग करून संन्यास घेतेय, याचं तुम्ही कौतुक केलं पाहिजे, असा सल्ला राखीने बाबा रामदेव यांना दिला.

ममता कुलकर्णी.. तू अशा लोकांचं बोलणं मनावर घेऊ नकोस, त्यांना सडेतोड उत्तर दे. तू काहीच चुकीचं केलं नाहीस. बाबा रामदेवजींचा मी खूप आदर करते. पण तुम्ही ममता कुलकर्णीबद्दल जे वक्तव्य केलं, ते चुकीचं आहे. तुम्ही तिचं कौतुक करायला हवं. तुम्ही संन्यासी बनून बिझनेसमन बनले. भगवे वस्त्र परिधान करून तुम्ही बिझनेस केला आहे, तुम्ही लोकांना लुटत आहात, अशी थेट टीका तिने केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!