पुणे हादरलं! मित्राचे कपडे काढून प्रायव्हेट पार्टला आयोडेक्स चोळलं, व्हिडिओ काढला अन्….,घटनेने उडाली खळबळ


पुणे : पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातील आयटी नगरी असलेल्या हिंजवडी येथे एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. तीन मित्रांनी मिळून जबरदस्तीने एका मित्राला कपडे काढायला भाग पाडून त्याच्या प्रायव्हेट पार्टवर ‘आयोडेक्स’ लावण्यास सांगितलं आहे.

त्यानंतर त्याच्या त्या नग्नावस्थेतील व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघांना अटक करण्यात आली आहे.

श्रेयस संजय कवडे (वय वर्षे. १९ हिंजवडी, मूळ रा. धाराशिव), ललित प्रमोद भदाने (वय वर्षे २१, हिंजवडी, मूळ रा. धुळे), राम तुळशीराम गंभीरे (वय वर्षे ३५, हडपसर, मूळ रा. लातूर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी २० वर्षीय पीडित तरुणाने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पीडित तरुण, आरोपी श्रेयस आणि ललित हे तिघे जण ताथवडे येथील एका शिक्षण संस्थेत शिकत आहेत. आरोपी श्रेयसने पीडित तरुणाला मारुंजी रोड येथील एका सोसायटीमधील त्याच्या फ्लॅटवर बोलावले होते. यावेळी राम गंभीरे याने पीडित तरुणाला सिगारेट हातात दिली. ती पीडित मुलाकडून खाली पडली.

दरम्यान, पीडित तरुणाने ती सिगारेट उचलून ऍशट्रेवर ठेवली. यामुळे राम गंभीरे याला राग आला. त्याने पीडित तरुणाला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याला कपडे काढण्यास सांगितले आणि झंडू बाम त्याच्या गुप्तांगावर लावण्यास भाग पाडले. यावेळी ललित याने या घटनेचा व्हिडिओ काढला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

यावेळी आरोपी राम गंभीरे याने पीडित तरुणाला धमकी देखील दिली. माझ्यावर ५३ गुन्हे दाखल असून माझे कुणी काही करू शकत नाही, असे म्हणत त्याने पीडित तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित मुलाने या प्रकरणी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी याची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!