ब्रेकिंग! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाला वेगळं वळण, ठाकरे गटाच्या आणि भाजप नेत्याचं नाव आलं समोर…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा आणि एक नवीन खुलासा समोर आला आहे. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी याने पोलिसांना दिलेल्या जबाबात अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत.
त्याने सांगितले की त्याचे वडील बाबा सिद्दीकी हे नेहमी आपल्या डायरीत घटनांचा तपशील लिहीत असत आणि हत्येच्या दिवशी भाजप नेते मोहित कंबोज यांचे नाव देखील डायरीत समाविष्ट होते. या खुलाशामुळे या हत्येच्या तपासाला नवे वळण मिळू शकते, कारण या हत्येमागे काही राजकीय षडयंत्र आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
झिशान सिद्दीकी यांचं चार पानी स्टेटमेंट आहे. त्यात त्यांनी ज्या-ज्या बिल्डरांची नाव घेतली आहेत, त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी तपास करावा असं म्हटलं आहे. माझे वडिल दोन दिवसांनी विधान परिषदेवर शपथ घेणार होते. पण त्याआधीच १२ ऑक्टोबरला त्यांची गोळी मारुन हत्या झाली, असं झिशानने सांगितले आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर १५ ऑक्टोबर २०२४ विधान परिषदेसाठी नामांकित केलेल्या नेत्यांनी शपथ घेतली. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासावर आपण समाधानी नाही हे आधीच झिशान यांनी स्पष्ट केलं होतं. आज या प्रकरणात काय आरोप-प्रत्यारोप होतात. झिशान स्वत: काय बोलणार? त्यावरुन मोठे राजकीय फटाके फुटू शकतात.