आता लाडकी बहीण आणि पीएम किसानचे पैसेही वसूल होणार, आकडा आहे ४ हजार कोटी, जाणून घ्या…

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहिण योजना सुरू केली होती. तसेच पीएम किसान सन्मान निधी सारख्या लोकप्रिय योजनांच्या जोरावर महाराष्ट्रात महायुतीची सत्ता कायम राहिली. असे असताना मात्र आता या योजनेबाबत अनेक घडामोडी घडत आहेत.

आता अपात्र लाभार्थ्यांना देण्यात आलेले कोट्यवधी रुपये वसूल करण्यासाठी नोकरशहांची धडपड सुरू आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात ३० लाख महिला अशा आहेत ज्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेचे निकष पूर्ण करत नाहीत. यामुळे सरकारचे पैसे वाया जातात.
त्यांना देखील दरमहा १,५०० रुपयांचे सहा हप्ते मिळाले आहेत. तसेच राज्यातील १.२ दशलक्ष अपात्र शेतकरी आहेत ज्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत अनुदान मिळाले आहे. यामुळे दोन्ही मिळून वसूल होणारी एकूण रक्कम ४,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यामुळे पैसे वसूल कसे करायचे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

दरम्यान, सरकार आता लाभार्थ्यांची यादी सुरळीत करत आहे. तसेच परिवहन विभागाकडून खरेदी करण्यात आलेल्या यादीमुळे लाभार्थी वर्षाला अडीच लाख रुपयांच्या कौटुंबिक उत्पन्नाच्या निकषाची पूर्तता करतात का, याची खातरजमा करता येणार आहे. यामुळे याकडे लक्ष लागले आहे.
पीएम किसानमध्ये चुकीच्या पद्धतीने वितरित करण्यात आलेल्या १५५४ कोटी रुपयांपैकी केवळ ९४ कोटी रुपयेच सरकारला वसूल करता आले आहेत. मात्र अजून अनेकांची रक्कम मिळाली नाही. यामुळे आता प्रशासनापुढे मोठं आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.