शिंदेंच्या खास शिलेदाराचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नव्हते, पण…


मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच राज्याच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर महायुतीमध्ये सत्ता वाटपाचा तिढा निर्माण झाला होता. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्याऐवजी देवेंद फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित झाले होते.

मात्र, या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होण्यास तयार नव्हते, असा गौप्यस्फोट राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्यात चर्चा सुरु झाल्या आहेत.

महायुतीच्या मागील सरकारचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत होते. तर, देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी होते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या.

मात्र, भाजपकडून त्यांना संख्याबळाच्या आधारे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची गळ घातली असल्याची चर्चा सुरू होती. सत्तावाटपाचा तिढा कायम असल्याने महायुतीला प्रचंड बहुमत मिळूनही सत्ता स्थापन झाली नव्हती.

एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री होण्यासाठी नकार दिला असल्याचे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून समोर आले होते. त्यानंतर आम्ही त्यांना भेटून विनंती केली की आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे. एकनाथ शिंदे या नावाने सध्याचे महायुती सरकार येण्यामध्ये फार मोठी ताकद होती. त्यामुळेच, तुम्ही सरकारमध्ये असलं पाहिजे असा आग्रह आम्ही केला होता, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

गुलाबराव पाटील यांनी पुढं म्हटले की, देवेंद्र फडणवीस हे आपल्या काळात उपमुख्यमंत्री होते. त्यांनीदेखील मोठे मन दाखवलं होतं. आपण सुद्धा यावेळेस मोठे मन दाखवलं पाहिजे आणि उपमुख्यमंत्री पद घेतलं पाहिजे, अशी विनंती एकनाथ शिंदेंना केली होती. सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारून शिवसेनेच्या सर्व आमदारांचा एकनाथ शिंदे यांनी मान ठेवला असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!