नोकरीच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार, घटनेने बारामतीत खळबळ, आरोपी अटकेत…

बारामती : एका परप्रांतीय महिलेवर बळजुबरीने लैंगिक अत्याचार करून तिला एका पत्राच्या शेडमध्ये डांबूल ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखा व माळेगाव पोलिसांनी संयुक्त कामगिरी करून पीडित महिलेची सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोपट धनसिंग खामगळ (वय.२५ रा. खामगळवाडी, ता. बारामती ) याच्यावर माळेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी खामगळ याचा पणदरे गावात हॉटेल व्यवसाय आहे. नौकरी देण्याच्या बहाण्याने त्याने सदर महिलेला पणदरे येथे घेऊन आला होता. ३ जानेवारी रोजी महिला पत्र्याच्या शेडमध्ये झोपली असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराबाबात कोणाला काही सांगितले तर तुझा खून करील, अशी धमकी दिली होती.
या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी पाहणी केली असता परप्रांतीय महिला शेडमध्ये आढळून आली. तिने पोलिसांना तिच्यासोबत घडलेला संपूर्ण घटना सांगितली. तसेच पोलिसांनी तिच्याकडे अधिक चौकशी केली असता पुण्यातील एका मैत्रीणीकडून आरोपी पोपट खामगळ याच्या सोबत ओळख झाल्याची सांगितले.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांना सांगून पुढील कार्यवाही करण्याचे आदेशाची कारवाई करण्याच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाला देण्यात आले होते. आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेऊन पुढील तपास पोलीस करीत आहेत.
