महाराष्ट्र गारठला!! पुन्हा एकदा थंडीला सुरुवात, तुमच्या जिल्ह्यातील तापमान जाणून घ्या…

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी वाढत आहे. काल राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया येथे १३.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वातावरणात बदल होत आहे. पुढील सहा दिवस राज्यात हवामान कोरडे राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
तसेच किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही दिवसांपूर्वी ढगाळ हवामान होऊन थंड वाऱ्यांना अडथळे झाले होते. परिणामी, राज्यातील कडाक्याची थंडी गायब झाली होती. मात्र आता हवामानात बदल होत आहे.
गेले तीन दिवस काही भागांत ढगाळ हवामान कमी होऊन आकाश निरभ्र होऊ लागले आहे. विदर्भात काही ठिकाणी, तर कोकण व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लावले आहे.
दरम्यान, १ ते ६ जानेवारी दरम्यान राज्यात हवामान कोरडे हवामान राहणार आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान रत्नागिरी येथे ३५.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर १७.४, परभणी १८, अकोला १८.६, अमरावती १६.८, बुलढाणा १८.४, ब्रह्मपुरी १६.१, गोंदिया १३.५, नागपूर १६.४, वाशिम २०, वर्धा १७.४ असे नोंदवले गेले.
तसेच मुंबई २२.२, सांताक्रुझ २०.३, रत्नागिरी २१.७, डहाणू १९.९, पुणे १५.४, लोहगाव १७.४, अहिल्यानगर १५.५, जळगाव १५.९, कोल्हापूर १८.२, महाबळेश्वर १५, मालेगाव १८, नाशिक १६.६, सांगली १८.५, सातारा १६.९, सोलापूर १८.६, असे नोंदवले गेले आहे. यामध्ये बदल होत आहे.