वाल्मिकी कराडच्या शरणागतीनंतर फडणवीसांचे मोठे वक्तव्य, म्हणाले..

बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराडने सरेंडर केलं आहे. पुण्याच्या सीआयडी ऑफिसमध्ये येऊन त्यांनी आत्मसमर्पण केलं. वाल्मिक कराडच्या या आत्मसमर्पणानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

दरम्यान, वाल्मिकी कराडच्या शरणागतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. जे या प्रकरणात दोषी असतील त्या कोणालाच आम्ही सोडणार नाही असा इशारा यावेळी फडणवीस यांनी दिला आहे.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबाशी माझं फोनवर बोलणे झाले आहे. या घटनेत जे दोषी असतील त्या कोणालाच सोडणार नाही. प्रत्येक दोषींवर कारवाई करणार. जाणीवपूर्वक हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे.

ज्यांचा -ज्यांचा या घटनेत सहभाग आहे, त्या प्रत्येकावर कारवाई होणार. आम्ही कोणालाही सोडणार नाही, मात्र ज्यांना यामध्ये राजकारण महत्त्वाचं वाटत त्यांना ते लखलाभ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.