पोरांना व्यायाम शाळेत मेंफेटरमाईन सल्फेटची इंजेक्शन विकायची, महिलेचा प्रताप बघून सगळेच हादरले, पोलिसांनी केली अटक…

पुणे : पुण्यातील हडपसरमध्ये एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका महिलेला इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करण्याच्या प्रयत्नात पकडले आहे. हे इंजेक्शन कशाच होतं, याबाबत भयंकर माहिती समोर आली आहे.

याबाबत माहिती अशी की, प्रसूतीच्या काळाच्या अत्यंत कमी प्रमाणात वापरली जाणारी मेंफेटरमाईन सल्फेट अर्थात टर्मिनची इंजेक्शन्स गेल्या काही वर्षांपासून जिममध्ये व्यायाम करणाऱ्या मुलांची उत्तेजना वाढवण्यासाठी तसेच नशा करण्यासाठी वापरली जात आहे.
काल तिच्याकडून तब्बल एक लाखाची इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. यामुळे याचे प्रमाण किती वाढलं आहे, याचा अंदाज येतो.
अंबिका उर्फ नेहा आनंदसिंग ठाकूर या हडपसरच्या माळवाडी परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून सध्या पोलीस तपास करत आहेत.

तिच्याकडून टर्मिन इंजेक्शनच्या १६० बाटल्या जप्त केल्या आहेत. त्यांची बाजारातील किंमत एक लाख रुपयांच्या आसपास आहे. नेहा ठाकूर ही नशा करण्यासाठी ही इंजेक्शन्स विकत होती, असे समोर आले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
नशा करण्यासाठी ही महिला इंजेक्शन विकते व प्रति इंजेक्शनचा दर ४०० ते ५०० रुपये असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून हडपसर पोलिसांनी छापा टाकून तिला पकडले आहे. हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहाय्यक निरीक्षक अर्जुन कुदळे यांना या संदर्भातील माहिती मिळाली होती.