Satish Wagh Murder : सतीश वाघ हत्या प्रकरणी भयंकर माहिती उघड! ४८ वर्षांच्या मोहिनी वाघ यांचं ३२ वर्षाच्या इंजिनिअर सोबत अफेअर…

Satish Wagh Murder : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आले आहे. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच सुपारी दिली होती. पत्नीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. पुण्यातील मांजरी परिससरात ९ डिसेंबरला पहाटे साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली.

सतीश वाघ यांचं अपहरण आणि हत्या ही वैयक्तिकरणास्तव करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. पण हत्येचे नेमकं कारण समोर आले नव्हते. अखेर दीड महिन्यानंतर हत्येचे खरे कारण समोर आले असून प्रेम प्रकरणातून सुपारी देऊन खून केल्याच उघड झाले. सतिश वाघ यांच्या पत्नीनेच ही हत्या केल्याचे समोर आले आहे. Satish Wagh Murder
हे. हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांची त्यांच्या पत्नीनेच पैसे देऊन हत्या करायला लावली आहे. मोहिनी वाघ असं या प्रकरणातील आरोपी पत्नीचे नाव आहे. दरम्यान ही हत्या प्रेमसंबंधातून झाल्याची धक्कादायक माहिती आहे. सतीश वाघ आणि मोहिनी वाघ यांच्या मुलाच्या मित्रासोबत मोहिनी वाघचे असलेल्या अनैतिक संबंधातून पती सतीश वाघ यांची हत्या घडवून आणल्याचं उघड झालं आहे.

भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. मात्र, सतीश वाघ यांची हत्या पैशांसाठी करण्यात आलेल्या अपहरणातून नाही तर अनैतिक संबंधांतून झाल्याचं समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. पुणे पोलिसांनी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हीला काल (बुधवारी) अटक केली आहे.

मोहिनी वाघचे वय सध्या ४८ वर्षे असून तिचा प्रियकर अक्षय जावळकर हा ३१ वर्षांचा आहे. अक्षय जावळकर हा मोहिनी वाघाच्या मुलाचा मित्र होता. मुलाच्या वयाचा असलेल्या अक्षय आणि मोहिनीचे अनैतिक संबंध असतील अशी शंका सुरुवातीला कोणाला आली नाही. मात्र, सतीश वाघ यांना हे समजताच मोहिनी-सतीश आणि अक्षय यांच्यामध्ये वाद सुरु झाले होते.अनेक वर्षे त्यांच्यातील वाद धुमसत होता आणि त्यातून सतीश वाघ त्यांची हत्या झाल्याची माहिती आहे.