मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना!! साध्या कागदावर अर्ज करा आणि वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळवा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…

मुंबई : महायुती सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये अन्नपूर्णा योजनेची सुरुवात केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना वर्षातून तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत दिले जात आहेत, असे असताना यामध्ये एक अडचण निर्माण झाली आहे.

अनेक पुरुषांच्या नावावर गॅस सिलिंडरचे कनेक्शन असल्याने हजारो महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळालेला नाही. आता ज्या महिलांच्या नावे गॅस कनेक्शन नाही त्यांना देखील याचा लाभ मिळू शकणार आहे. यासाठी गॅस कनेक्शन हे पुरुषाच्या नावावरून महिलांच्या नावावर करावे लागणार आहे.
याची प्रोसेस देखील सोपी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला वर्षातून तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची शासनाची योजना आहे. यामुळे ही एक फायदेशीर योजना आहे.

यासाठी आता त्यांना जवळच्या गॅस एजन्सी किंवा वितरकाकडे जाऊन फक्त साध्या कागदावर अर्ज करून आधारकार्ड जोडून दिल्यास त्यांना कनेक्शनवरील नाव बदलून मिळणार आहे. यामुळे ही एक सोपी पद्धत आहे. यामध्ये सुरवातीला संबंधित लाभार्थीस संपूर्ण पैसे द्यावे लागतील.
नंतर काही दिवसांनी शासनाचे अनुदान त्या लाभार्थींच्या बॅंक खात्यात जमा होत आहे. योजनेचा लाभ हा फक्त ज्या लाडक्या बहिणीच्या नावाने गॅस कनेक्शन आहे त्यांनाच मिळू शकणार आहे. यामुळे याबाबत त्यांना काम करावे लागणार आहे.