एकच विद्यार्थी आणि एकच शिक्षक! या शाळेची होतेय राज्यात चर्चा…!


वाशिम : सध्या राज्यात काही मराठी शाळा या बंद पडण्याच्या अवस्थेत आहे. अनेक मुलं ही मराठी सोडून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेत आहेत. आता एका विद्यार्थ्यासाठी शाळेत एक शिक्षक असल्यामुळे वाशिम जिल्ह्यात सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

या जिल्हा परिषदेच्या शाळेत एक विद्यार्थी असल्यामुळे शिक्षक सुध्दा एकचं आहे. वाशिम जिल्ह्यातील गणेशपूर गावात ही शाळा आहे. एका विद्यार्थ्यासाठी आता ही शाळा सुरू ठेवण्यात येत आहे.

गावातील लोकांनी आपली मुलं इंग्रजी माध्यमात शिकायला पाठवल्यामुळे गावातील शाळेत एकचं विद्यार्थी आहे.घरची परिस्थिती बेताची, पालकांना इंग्रजी शाळा न परवडणारी असल्यामुळे एका विद्यार्थ्यासाठी गणेशपूरची शाळा सुरु आहे.

तसेच एकच शिक्षक विद्यार्थ्यांला शिक्षणाचे धडे देताना पाहायला मिळत आहे. यामुळे या शाळेची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. येणाऱ्या काळात अनेक मराठी शाळा बंद पडतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!