Vande Bharat : पुणेकरांसाठी रेल्वेचे मोठं गिफ्ट! नवीन वर्षात मिळणार अजून एक वंदे भारत ट्रेन, जाणून घ्या रुट…

Vande Bharat : पुण्याला लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे. भारतीय रेल्वे पुणेकरांना आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट देणार अशी आशा आहे. पुण्याला नवीन वर्षात एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार शोभा बच्छाव यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. या भेटीत खासदार महोदयांनी धुळ्याला वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळावी अशी मागणी केली.
त्यांनी धुळे ते पुणे आणि धुळे ते मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवली गेली पाहिजे अशी आग्रही मागणी रेल्वेमंत्र्यांच्या या भेटीत उपस्थित केली आणि महत्त्वाचे म्हणजे नव्या वर्षात या मागणी संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन रेल्वेमंत्री महोदयांनी शोभा बच्छाव यांना दिलेले आहे. Vande Bharat

यामुळे नवीन वर्षात मुंबई ते धुळे आणि पुणे ते धुळे दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊ शकतो असा मोठा दावा आता होऊ लागला आहे. मात्र असे असले तरी वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याबाबतचा अंतिम निर्णय हा रेल्वे बोर्डाचा असतो यामुळे रेल्वे बोर्ड खासदार शोभा बच्छाव या मागणीवर सकारात्मक निर्णय घेणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.