‘पीएमपीएमएल’चा तोटा वाढला ; तिकीट दरात वाढ करुन सेवेचा गाडा हाकलणार ….


पुणे :  पीएमपीएमएलचा तोटा ७५० कोटी रुपयांच्यावर गेला असून कर्मचार्‍यांना नोकरीत कायमस्वरुपी केल्याने वेतनावरील खर्च वाढला आहे. पीएमपीएमएलला आर्थिक बळ देण्यासाठी तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय प्रशासनाच्या विचाराधीन असल्याची बाब समोर आली आहे.

पीएमटी आणि पीसीएमएमटीचे विलिनीकरण होउन पीएमपीएमएल ही स्वतंत्र कंपनी स्थापन झाल्यानंतर ही सेवा केवळ दोनच महापालिकांच्या हद्दीत सिमित न राहाता जिल्ह्यातील अनेक महत्वांच्या गावांपर्यंत पोहोचली असून सर्वसामान्यांसाठी महत्वाची ठरली आहे.

परंतू वाढत्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी मिळत असल्याने पीएमपीएमएलचा तोटा दिवसेंदिवस वाढत चालला असून चालू आर्थिक वर्षात तो ७५० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.तोटा वाढत असताना खर्चही वाढत आहे.

कर्मचार्‍यांना सातवा आयोगानुसार वेतन, मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कायम सेवेत घेतल्याने वेतनावरील वाढलेला खर्च, इंधन खर्चातील वाढ यामुळे संचलन तोटा वाढत आहे. अशातच प्रशासनाने मागील आठ वर्षांमध्ये पीएमपीएमएलच्या तिकीट दरात वाढ केली नाही. अन्य मार्गाने उत्पन्न वाढविण्यावर देखिल मर्यादा आहेत. यामुळेही तोट्याचे प्रमाण वाढत असून ही संचलनातील तूट पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका ६०:४० या प्रमाणात भरून देत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!