वाघोली -शिरुर तर हडपसर ते यवत इलिव्हेटेड मार्ग प्रत्यक्षात उतरणार काय ! महायुती पार्ट -२ सरकारकडून अपेक्षा वाढल्या ….!!

जयदिप जाधव

उरुळीकांचन : राज्यात फडणवीस -शिंदे – पवार या महायुतीचे पार्ट- २सरकार बहुमताने निवडून आल्यानंतर जनतेकडून नव्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. केंद्रात व राज्यात डबल इंजीनचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर केंद्रातून निधीचा मोठा राज्याला मिळेल अशी अपेक्षा आहे. केंद्रात मोदी व राज्यात फडणवीस सरकारने रस्ते, महामार्ग, पूल व विमानतळ बांधणीला प्राधान्य दिले आहे. हाच दृष्टीकोन पुढील पाच वर्षात अपेक्षित आहे. मात्र गेली पाच वर्ष रखडलेल्या पुणे- सोलापूर व पुणे-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाची शहरालगतची कनेक्टिव्हिटी सुधरविण्यासाठीआंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्ग या पाच वर्षात स्वप्नात उतरतिल कायअशी मागणी जिल्ह्याच्या दक्षिण भागातून होत आहे.

पुणे शहराला जोडणाऱ्या पुणे -सोलापूर व पुणे-अहिल्यानगर हे राष्ट्रीय महामार्ग वाहतुक कोंडीचा जंजाळात मागील दहा वर्षे पडून आहे. या महामार्गांवर पुणे शहरातून अथवा शहराबाहेरून पुण्यासाठी येण्यासाठी अतिशय आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे शहरालगत शहरीकरण व काही औद्योगिकीकरण वाढल्याने रस्त्यांची आवस्था तोडकी पडू लागली आहे. उलट या भागात नव्या शहरीकरणाचा वेग वाढू लागल्याने प्रशस्त रस्ते व उड्डाणपूलांची गरज भासू लागली आहे.अशातच या भागात वाढती वाहतुक कोंडी तीव्र समस्येला रुप देऊ लागली आहे.
मागणी दहा वर्षांत दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने मनुष्यबळाच्या जीवावर वाहतुक कोंडी फोडणे शक्य नसल्याने पुणे -सोलापूर महामार्गावरील हडपसरहून यवत पर्यंत प्रस्तावित इलिव्हेटेड उड्डाणपूल पूल तर पुणे -अहिल्यानगर मार्गांवर वाघोली ते शिरुर असा उड्डाणपूल प्रस्तावित आहे.यातील वाघोली ते शिरुर उड्डाणपूलासाठी एनएचएआय ने टेंडर प्रक्रिया राबविली. मात्र हा मार्ग महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग झाला.तर हडपसर ते यवत पर्यंतचा मार्गाला केंद्रीय वाहतुक मंत्रालयाने एलिव्हेटेड मार्गाला मंजुरी दिली आहे.त्यानुसार एनएचए आयकडून डीपीआर सुरू आहे.मात्र हा पण मार्ग रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यासाठी हालचाली सुरू आहे.या मार्गाला दौंडचे आमदार राहुल कुल यांचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र या कामांना गतीच नसल्याचे या भागातील लोकप्रिय इलिव्हेटेड मार्गाची फक्त चर्चा असून ती कधी प्रत्ययास येणार म्हणून नेहमीचा प्रश्न आहे. या दोन्ही मार्गांची कामे महायुती पार्ट -२ या सरकारच्या माध्यमातून सुरू व्हावीत अशी अपेक्षा या भागातील नागरीकांची आहे.
” वाघोली ते शिरूर व हडपसर ते यवत पर्यंत प्रस्तावित असलेल्या दोन्ही इलेव्हेटेड मार्गांसाठी ठोस भूमिका घेणार आहे.या मार्गांसाठी विशिष्ट नियोजन करुन टप्पा-टप्प्यांवर मंजुऱ्या मिळून काम सुरू करण्यास प्राधान्य आहे. डीपीआर अंतिम झाला सर्व ताकदीनिशी पाठपुरावा करुन गेमचेंजर प्रकल्पांनागती देण्यात येईल “
– ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके , आमदार शिरुर- हवेली