New Rules : डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून होणार अनेक बदल, LPG सिलेंडर, क्रेडिट कार्ड अन्…; जाणून घ्या…

New Rules : १ डिसेंबर २०२४ पासून अनेक नियम बदलणार आहेत, याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. त्यात आता नोव्हेंबर महिना संपत आला आहे आणि डिसेंबर सुरु होणार आहे. नवीन महिना आपल्यासोबत अनेक मोठे बदल घेऊन येणार असल्याची शक्यता आहे.
एटीएफ किमतींमध्ये बदल..

एलपीजी सिलिंडरच्या किमतींसोबतच एअर टर्बाइन इंधन (ATF) ची किंमत देखील तेल वितरण कंपन्यांकडून महिन्याच्या पहिल्या दिवशी सुधारित केली जाते. यानंतर १ डिसेंबरला हवाई इंधनाच्या किमतीतही बदल होऊ शकतो. या बदलांचा थेट परिणाम हवाई प्रवाशांवर दिसून येत आहे. New Rules
ओटीपीची प्रतीक्षा करावी लागेल
ट्रायनचा व्यावसायिक संदेश आणि ओटीपीशी संबंधित ट्रेसेबिलिटी नियम लागू करण्याचा निर्णय १ डिसेंबरपासून लागू हाेणार आहे. यापूर्वी दूरसंचार कंपन्यांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत त्याची अंमलबजावणी करायची होती. परंतु अनेक कंपन्यांच्या मागणीनंतर त्याची अंतिम मुदत ३१ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली.

टेलिकॉम कंपन्या ट्रायचा हा नियम १ डिसेंबरपासून लागू करू शकतात. हा नियम बदलण्याचा उद्देश हा आहे की दूरसंचार कंपन्यांनी पाठवलेले सर्व संदेश ट्रेस करण्यायोग्य असतील, जेणेकरून फिशिंग आणि स्पॅमची प्रकरणे थांबवता येतील. नवीन नियमांमुळे ग्राहकांना ओटीपी येण्यात विलंब होऊ शकतो.
एलपीजी सिलेंडरची किंमत…
प्रत्येक महिन्याप्रमाणे या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. ११ नोव्हेंबरला १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. तेल आणि वायू वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी किंमतीत सुधारणा करतात. दीर्घकाळापासून स्थिर असलेल्या १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.
एसबीआय क्रेडिट कार्ड नियम…
तुम्ही डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म/व्यापारी यांच्याशी संबंधित व्यवहारांसाठी एसबीआय क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर १ डिसेंबरपासून नवीन नियम लागू होत आहेत. एसबीआय कार्ड्स वेबसाइटनुसार, ४८ क्रेडिट कार्ड डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म/व्यापारी यांच्याशी संबंधित व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्स देणार नाहीत.
सिम कार्ड खरेदीसाठी KYC गरजेचे..
नवीन सिम खरेदीचे नियम आता बदलण्यात आले आहेत. हे नियम आजपासून लागू होणार आहेत. आता कोणताही दुकानदार पूर्ण केवायसी केल्याशिवाय कोणत्याही ग्राहकाला सिम विकू शकणार नाही.
केवायसी व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात सिम खरेदीवरही बंदी घालण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार आता एका आयडीवर मर्यादित सिम कार्ड जारी करण्याची तरतूद करण्यात आली आहे. नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना १० लाख रुपयांपर्यंत दंड आणि तुरुंगवासही होऊ शकतो, असे दूरसंचार विभागाने सांगितले आहे.