Weather Update : थंडीचा कहर!! महाराष्ट्रावर मोठं संकट, पुण्यासह या जिल्ह्यांत थंडीची लाट, हवामान विभागाकडून इशारा…

Weather Update : उत्तरेकडून हिमालय क्षेत्राच्या दिशेने येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढल्यामुळे कोरड्या वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसून येत आहे. पुढील ३ दिवस राज्यात कडाक्याची थंडी पडणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

काही ठिकाणी तर थंडीचा यलो अलर्ट देखील देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात थंडी पडली असून, अनेक ठिकाणी किमान तापमानाची नोंद १० अंशाखाली झाली आहे.
तसेच मुंबई उपनगरांतही किमान तापमान २० अंशाच्या खाली नोंदले गेले आहे. मुंबईकर गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा अनुभव घेत आहेत. रले अवघे काही तास, IMD कडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

फेंगल चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा दक्षिण भारतातील राज्यांना बसण्याची शक्यता आहे. तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये फेंगल चक्रीवादळामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. Weather Update

दरम्यान, पुढील दोन दिवस तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. नाशिक, घाटमाथा, अहिल्यानगर, पुण्यात थंडीची लाट येणार येणार. त्याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
दरम्यान, पुणे शहरामध्ये सध्या कडाक्याची थंडी पडत असून, किमान तापमान ८ अंशावर पोचले आहे. थंडीची लाट येणार असल्याने हा पारा अजून खाली घसरू शकतो.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक भागांमध्ये ३ ते ५ डिग्री तापमान पुढच्या ५ दिवसांत बदलणार आहे. दिवसा कोरडं हवामान राहील, संध्याकाळपासून गारठा जाणवायला सुरुवात होईल आणि रात्री उशिरा तापमान अधिक घटण्याची शक्यता आहे.