Maharashtra Election Result : मोठी बातमी! शिरूरमध्ये सातव्या फेरीत माऊली आबा कटके १७,२८१ मतांनी आघाडीवर, अशोक पवार पिछाडीवर..


Maharashtra Election Result : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे कल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील २८८ मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली आहे. राज्यात पुढील सरकार कुणाचं येणार? याचा फैसला आज होणार आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत. गेल्या महिन्याभरापासून विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी, सत्तासंघर्ष, पक्षफुटी आणि नात्यातील दुरावा यामुळे महाराष्ट्राचे राजकारण देशभरात चर्चेचा एकच विषय होता. Maharashtra Election Result

या पार्श्वभूमीवर, २० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आज २३ नोव्हेंबर २०२४ रोजी निकाल जाहीर होतोय. त्यानुसार मतमोजणीला सुरुवात झाली असून शिरूर-हवेलीमधून माऊली आबा कटके १७,२८१ मतांनी आघाडीवर, अशोक पवार पिछाडीवर आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!