व्हॉट्सअँपला दिलासा ! व्हॉट्सअँपवर बंदी घालण्याची याचिका न्यायालयाने फेटाळली …

नवी दिल्ली : व्हॉट्सअँप नवीन माहिती तंत्रज्ञान नियमांचे (आयटी नियम) पालन करण्यास नकार दिल्याने व्हॉट्सअँपबंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

याचिकाकर्ते ओमानकुट्टन के. जी. यांनी यापूर्वी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत सरकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशांचे पालन न केल्याने केंद्र सरकारने व्हॉट्सअँप बंदी घालण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली आहे.
या याचिकेनुसार याचिकाकर्ते ओमानकट्टून यांनी माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया एथिक्स कोड) नियम, २०२१ (आयटी नियम) या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी व्हॉट्सअँप बंद घालण्याची मागणी केली होती.
