Pune Crime : गुंगीचे औषध देऊन बलात्कार, फोटो अन् व्हिडीओ काढून….!! पुणे शहरातील घटनेने उडाली खळबळ

Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पाण्यातून गुंगीचे औषध पाजून तरुणीवर बलात्कार केला मग त्यानंतर त्याचे फोटो आणि व्हिडीओ चित्रीकरण केले. पुढे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीकडून ३ लाख ८० हजार रुपयांची खंडणी उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


ही घटना ऑगस्ट २०२३ ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी तरुणीने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी आरोपी सद्दाम सय्यद (वय.२६) याच्याविरुद्घ बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनसुार, तरुणी आणि आरोपी हे एकत्र एका कॉल सेंटरमध्ये काम करत होते. त्यामुळे त्यांच्यात ओळख वाढली होती. एके दिवशी कामानिमित्त दोघेजण हॉटेलमध्ये थांबले होते त्यावेळी आरोपीने तरुणीला पाण्यातून गुंगीचे औषध दिले. Pune Crime
त्यामुळे तरुणीला ते पाणी पिल्यानंतर गुंगी आली. तरुणी बेशुद्ध झाल्यावर आरोपीने तरुणीसोबत शरीरसंबंध ठेवले. त्यावेळी सद्दामने त्या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो काढले. तसेच ते व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून १ लाख २ हजार ८५० रुपये ऑनलाईन घेतले आहे. तसेच २ लाख ७८ हजार रुपये रोख जबरदस्तीने तरुणीकडून घेतल्याचे तिने फिर्यादीत नमूद केले आहे
