पुणे शहर पोलिस आयुक्तालयात सहाय्यक पोलिस आयुक्त व वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या…!


पुणे :  राज्याच्या गृह विभागाने नुकत्याच महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.पुणे ग्रामीण पोलीस दलापाठोपाठ आता शहर पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. शहर पोलीस दलात ४ सहायक पोलीस आयुक्तांसह १३ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवारी  रात्री दिले.

दरम्यान गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांची विश्रामबाग विभागात सहायक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी सुनील पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्तालयातील प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे यांची सिंहगड रस्ता विभागात सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!