धक्कादायक! पोटात दुखतं म्हणून डॉक्टरकडे गेला, पोटात दारूऐवजी चक्क दारूची बाटलीच सापडली…!

रौतहाट : सध्या अतिशय विचित्र घटना नेपाळमधील रौतहाट जिल्ह्यातील गुजारा नगरपालिका क्षेत्रात घडली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. 26 वर्षीय तरूणाच्या पोटात खालच्या भागात खूप दुखायला लागल्यावर तो डॉक्टरांकडे गेला.

नंतर त्याची शस्त्रक्रिया करावी लागली. धक्कादायक गोष्ट म्हणजे शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या तरूणाच्या पोटातून चक्क एक व्होडकाची बाटली काढण्यात आली. नुरसाद मन्सुरी असे त्या तरूणाचे नाव असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोटातील बाटली काढण्यासाठी त्याच्यावर दोन ते अडीच तास शस्त्रक्रिया सुरू होती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बाटलीमुळे त्या तरूणाचं आतडं फाटलं होतं. यामुळे त्यांचे पोट सारखेच दुखत होते.

एका पार्टीमध्ये नुरसादच्या मित्रांनी त्याला दारू पाजून नंतर त्याच्या गुप्तांगामधून व्होडकाची बाटली पोटात घुसवली असावी, असे म्हटले आहे. या तरूणाच्या गुदद्वारातूनच ही बाटली शरीरात गेली असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याबाबत पोलीस तपास करत आहेत. यामध्ये एकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे मात्र एकच चर्चा सुरू झाली आहे. रौतहट पोलिसांनी समीम शेख याला अटक केली आहे. तसेच नुरसाद याच्या अनेक मित्रांचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.