आता H3N2 इन्फ्लूएंझा संसर्गाची भिती ! देशात दोघांचा मृत्यू ,तीन हजार बाधीत …!


नवी दिल्ली : H3N2 इन्फ्लूएंझा संसर्ग देशात घातक ठरला आहे. हरियाणा आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत HN2 सह वेगवेगळ्या फ्लूची लागण झालेले तीन हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.

यापैकी जानेवारी महिन्यात 1245 रुग्ण आढळले. फेब्रुवारीमध्ये 1,307 तर 1 ते 9 मार्चपर्यंत 486 रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांना सतर्क राहण्याच्या आणि वाढत्या संसर्गावर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले.

आज नीति आयोग राज्यांच्या आरोग्य विभागांसोबत बैठक घेणार आहे. देशात HN2 इन्फ्लूएन्झा प्रकरणांमध्ये तीव्र वाढ झाल्यानंतर अधिकार प्राप्त गट आणि कोविड-19 (NEGVAC)साठी लस प्रशासनावरील राष्ट्रीय तज्ञ गटानेही आज अंतर्गत बैठक बोलावली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!