Pune Crime : धक्कादायक! पुण्यातील बिबवेवाडीत वैमनस्यातून तरूणावर हल्ला, सिमेंटचा गट्टू डोक्यात घातला अन्…,घटनेने उडाली खळबळ


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. सध्या अशीच एक समोर आली आहे.

पुर्व वैमनस्यातून टोळक्याने तरुणावर हल्ला केल्याची घटना बिबवेवाडीतील इंदिरानगर येथे घडली. याप्रकरणी टोळक्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

या घटनेत रोहित राजेंद्र गाडे (वय ३४ रा. बिबवेवाडी ) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकणी गाडे याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, गणेश लावडे, प्रथमेश कचरे, श्रेयस कांबळे (सर्व रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) यांच्यावर गु्न्हा दाखल केला आहे. Pune Crime

मिळालेल्या माहिती नुसार, रोहित रविवारी (ता.२०) इंदिरानगर परिसरात मित्रासोबत गप्पा मारत थांबला होता. तेव्हा रोहितचा गणेश लावडे याच्याशी वाद झाला. गणेश साथीदारांसह इंदिरानगर येथे आला. त्याने रोहित याला शिवीगाळ केली.

टोळक्याच्या हातात बांबू होते. ‘आज याला जिवंत ठेवायचे नाही, याला संपवून टाका’, अशी धमकी देऊन गणेश आणि साथीदारांनी त्याच्यावर हल्ला केला. तर, रस्त्यात पडलेला सिमेंटचा गट्टू रोहितच्या डोक्यात मारला. नंतर टोळके पसार झाले. यात रोहित गंभीर जखमी झाला. अधिक तपास सहायक निरीक्षक संजय निकुंभ करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!