Pradip Kand : खाजगीला पारितोषिक घ्यायचे आणि सहकारी कारखाना बंद पाडायचा अशी कर्तबगारी अशोक पवार करु शकतात; अजित पवार यांच्यावर कर्जे नाकारल्याचा आरोप खोटारडेपणा, प्रदिप कंद यांची सडकून टिका…


Pradip Kand शिक्रापूर : देशात सहकार चळवळीत एक दुर्मिळ उदाहरण असेल की एका व्यक्तिच्या अधिपत्याखाली स्वतःचा खाजगी कारखाना उत्कृष्ट नियोजनाचे परितोषिक मिळवतोय व त्यांच्याच २५ वर्षे अधिपत्याखालील सहकारी साखर कारखाना अर्थिक नियोजनाने बंद पडतो हे एक कर्तृत्व अशोक पवार यांनी खाजगी प्रेमापोटी करुन दाखविले असून सहकारी साखर कारखान्यातून स्वार्थ साधण्यासाठी सहकारी कारखान्याचे लचके तोडले गेले असून पुणे जिल्हा सहकारी बँकेतून घोडगंगा व स्वतःच्या खाजगी कारखान्याला अजित पवार साडेतीनशे कोटी कर्ज देऊ शकतात मग अजित पवार यांच्यावर कर्ज नाकारुन कारखाना बंद पाडल्या चा आरोप हा सरळसरळ खोटा असल्याचा पुन्नउच्चार पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद केला आहे.

न्हावरे (ता.शिरुर) येथे शिरुरकरांच्या स्वाभिमानी घोडगंगा बचाव किसान क्रांती पदयात्रेची सांगता सभेत प्रदिप कंद यांनी आ.अशोक पवार यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत जोरदार टिका केली. शिरुर तालुक्यात घोडगंगेच्या सभासदांच्या गेली १० दिवस पदयात्रा काढून कारखान्याला वाचविण्यासाठी जनजागृती व कारखान्याचा सद्यस्थितीचा भांडाफोड करण्यासाठी पदयात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेचे शिरुरकरांनी जोरदार स्वागत करुन न्हावरेत सांगता सभा घेऊन पदयात्रेची सांगता केली. यावेळी प्रदिप कंद यांनी आ.अशोक पवार यांच्या २५ वर्षे सत्तेच्या राजवटीचा समाचार घेऊन सत्य स्विकारावे असे थेट आव्हान दिले आहे.

प्रदिप कंद म्हणाले, घोडगंगा कारखाना एका घराण्याकडून चालू होतो. तालुक्यातील जुनी पिढी त्यांना साथ देते मात्र या घराण्यातील एक स्वतः ला कर्तबगार समजून घेणारा नेता याच कारखान्याला खड्यात घालतो हा विरोधाभास तालुक्याची जनता मुकाटपणे पाहत आहे. निवडणूक येतात जातात मात्र निवडणूकीसाठी कारखान्याचा वापर होतो ,मतदारांना पैसे वाटण्यासाठी कामगारांचा वापर होतो, त्याच कामगारांना पगार काढण्यासाठी महिना -महिनाभराचे उपोषण करावे लागते हे मोठे दुर्दैव आहे. निवडणूक आली की कारखान्याचा वापर , बंद पडला की, अजित पवार यांनी बंद पडला हा दुटप्पीपणा राजकारणात सुरू आहे. Pradip Kand

कारखान्याची २००९ पर्यंत प्रगती होते, पुरस्कार प्राप्त होतात मग हा कारखाना एकहाती सत्ता बंद कसा पडू शकतो ? आणि याच तालुक्यात स्वतः चा प्रायव्हेट कारखाना मात्र पुरस्कार मिळवतो हा मोठा विरोधाभास सभासदांनी ओळखणे आवश्यक आहे. जे अजित पवार यांच्या इतक्या मदतीला आले त्यांना खोटे ठरविणे किती सभ्यपणाचे लक्षण आहे? कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी तीनवेळा विधानसभेची उमेदवारी अजित पवार यांनी मिळवून दिली. अगदी दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणूकीत अजित पवार यांची मदत घेऊन त्यांनी कारखाना निवडणूक जिंकली.

या निवडणूकांत अजित पवार यांच्या माध्यमातून हा कारखाना वाटचाल करीत असल्याचे सांगितले. मग आता अजित पवार यांच्यावर कारखाना बंद पाडल्याचा खोटा आरोप कसे करु लागले? वास्तविक हा कारखाना अशोक पवार यांच्या खाजगी प्रेमापोटी बंद पडणार म्हणून तत्कालीन आ.बाबुराव पाचर्णे यांनी २०१४ सालीच तालुक्यात पदयात्रा काढून सभासदांना सावध केले होते. मात्र खोटे बोलण्यात पारंगत असलेल्या अशोक पवार यांनी सभासदांनी वारंवार दिशाभूल केली. आता त्यांच्या वारसांना वारसनोंद करुन घेत नाही? एकिकडे खाजगीउत्कृष्ट चालवायचा आणि सहकारीचा गळा घोटायचा हे कर्तव्य अशोक पवार यांचेच आहे.

संचालक दादा पाटील फराटे म्हणाले, कारखान्याच्या संचालक मंडळात कारभार केलेली अनेक मंडळी त्यांच्याविरोधात का गेली आहेत ? त्यांच्या खाजगी प्रेमापोटी सहकारी कारखाना बंद पाडायचे शब्द त्यांचे सहकारी रवी काळे का पटले नाहीत? त्यांनी खाजगीच्या आडून सहकारी कारखाना कसा आडचणीत आणण्याचे काम केले हे तालुक्याने अभ्यासले पाहिजे. ज्या अजित पवार यांनी त्यांना अनेक विधानसभा व कारखाना या निवडणूकीत संधी दिली त्यांना खोटे ठरविण्याचे पाप अशोक पवार यांनी केले आहे.

या सांगता सभेत राहुल पाचर्णे, रवी काळे, सुधीर फराटे, बाबासाहेब फराटे, आबासाहेब सोनवणे , शशिकांत दसगुडे , रामभाऊ सासवडे, राजेंद्र कोरेकर आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!