भीमा नदीत मासेमारीसाठी मज्जाव करत महिलेला पतीसह मारहाण ; दोघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

पुणे : राजेगाव (ता. दौंड ) येथील मासेमारी करून उदरनिर्वाह करण्याऱ्या पती पत्नीस दोघांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार काल (ता.७) दुपारी १२ वाजता घडला आहे.

दरम्यान , याप्रकरणी रेशमा न्यास काळे (राजेगाव, पुणे) यांनी फिर्याद दाखल केली असता पोलिसांनी विशाल विलास काळे, बांग्या लतीफ भोसले (दोघे रा.राजेगाव ता.दौंड जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , भीमा नदीत तक्रारदार मासेमारीचा व्यवसाय करीत असून तक्रारदारास भीमा नदीत मासे पकडायचे नाही, आम्ही येथे मासे पकडणार अशी धमकी देत पती पत्नीस शिवीगाळ व दमदाटी करीत लाथाबुक्याने मारहान केली. तसेच धारदार हत्याराने मांडीवर वार केले. याबाबत पीडित महिलेने दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास दौंड पोलीस करीत आहे.
