Supriya Sule : भाजपकडून इतिहास बदलण्याचा प्रयत्न! खासदार सुप्रिया सुळे यांची जोरदार टीका, नेमकं काय म्हणाल्या?

Supriya Sule : शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. महाराष्ट्रात देखील गुन्हेगारी वाढली असं केंद्र सरकारकडूनच सांगण्यात येत आहे. राज्यातील सरकार अपयशी ठरलं आहे. असे सुप्रिया सुळे म्हणल्या.

काल बारामतीत घटना घडली ती दुर्दैवी आहे. अशा घटना होऊ नये असं माझं मत आहे, असं सुप्रिया सुळेंनी सांगितले. भाजपकडून इतिहास बदलण्याचा प्रयत्न आहे. भाजपचे लोक चुकीचा इतिहास मांडत आहे. मात्र आम्ही त्यांना मांडू देणार नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शरद पवारांवर जनतेने प्रेम आणि विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपला पाहिजे. त्याची ही पोहोचपावती आहे. दिल्लीत शरद पवार यांच्याकडे एक हक्काचा माणूस म्हणून बघितले जातं, पण जरी वेगळा पक्ष असला तरी आणखी एक आपला हक्काचा माणूस आहे, ते म्हणजे नितीन गडकरी.

तसेच बारामतीचा जागा कुठला पक्ष लढवणार हे अजून निश्चित झालेलं नाहीय. गणेशोत्सवानंतर यावर चर्चा होईल. कोण-किती जागा लढवणार, यावर निर्णय झाला आहे, अशी माहिती देखील सुप्रिया सुळेंनी दिली. Supriya Sule
ते पुढे म्हणल्या, अनेक वेळा आपल्याला अस्वस्थ करणारी परिस्थिती असते. अन्याय झाला असं वाटतं. ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा पक्ष काढून घेतला. हा देश संविधानानेच चालणार कुठल्याही आदर्श शक्तीच्या मनमर्जी न चालणार नाही.
संविधान वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, नेहमी सत्याचाच विजय होतो. काहीही झालं तरी आम्हाला न्याय मिळेल. न्यायालयाने आम्हाला लवकर न्याय द्यावा, असं असं सुप्रिया सुळेंनी सांगितले आहे.