वेल्हे तालुक्यात भरदिवसा पप्पूशेठ रेणुसे यांचा खून ! आरोपींनी जवळुन गोळ्या घालून रेणुसेंना केले ठार…!

पुणे : ऐरवी शांत असलेल्या वेल्हे तालुक्यात आज वेगळीच घटना घडली आहे. तरुणावर फायरींग करुन खून करुन हल्लेखोर पसार झाले आहे. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे.
नवनाथ उर्फ पप्पूशेठ रेणूसे (रा. पाबे, रामवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रेणूसे हे वेल्हे तालुक्याच्या ठिकाणी आले होते. त्यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला, आणि दुचाकीवरुन पळून गेले. यामध्ये गंभीर जखमी होऊन रेणूसे यांचा मृत्यू झाला आहे.
रेणूसे यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरुन पळून गेले आहेत.वेल्हे पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. कोणत्या कारणामुळे खून करण्यात आला हे अद्याप समजू शकले नाही.
Views:
[jp_post_view]