Uruli Kanchan : हवेली तालुक्याची नेतृत्वाची पोकळी यंदा भरुन निघणार काय! विधानसभेला आमदारकीचे स्वप्न सत्यात उतरणार काय?


जयदीप जाधव

उरुळीकांचन : विधानसभेचे वादळं उठलं असून निवडणूकीचा फड गाजण्यास सुरुवात झाली आहे.या विधानसभेच्या फडात आता हवेली तालुक्यात तगडे इच्छुक मैदानात उतरले असून पूर्व हवेली तालुक्यात इच्छुकांचा आवाज घुमू लागला आहे. तालुक्याला यंदाच्या वर्षीआमदारकी मिळून स्वातंत्र्य पूर्व काळापासून अधुरी राहिलेली इच्छा तालुका पूर्ण करील म्हणून हवेलीकरांच्या नजरा या निवडणूकीकडे लागल्या आहेत. परंतू या निवडणूकीला तालुक्याला संधी मिळेल, तालुका विधानसभेचे प्रतिनिधित्व करेल म्हणून आता जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. विधानसभेच्या प्रतिनिधित्वातून तालुक्यातील नेतृत्वाची पोकळी भरुन निघेल काय? असा आशावाद हवेलीकरांना वाटू लागला आहे.

पुणे जिल्ह्यात प्रांतिक रचना पूर्ण झाल्यानंतर सर्वात मोठा तालुका म्हणून संपूर्ण राज्यात या तालुक्याची गणना झाली आहे. महाराष्ट्रात अपवादात्मक असे तालुके असून या तालुक्याला शहरी भागाचे नाव न मिळता हवेलीचे नाव मिळाले आहे. एकसंध असा तालुका नसल्याने तसेच पुणे शहरालगत चारही बाजूंनी विस्तार असलेला तालुका अशी रचना झाल्याने तालुका म्हणून एकमुखी नेतृत्वाचा अभाव स्व. खा.आण्णासाहेब मगर यांच्यानंतर लाभला नाही.अशातच तालुक्याची विभागणी अनेक मतदारसंघात झाल्याने हवेलीत एकमुखी नेतृत्वाचा निर्माण झाला. आजही तो अभाव नेतृत्वाची पोकळी म्हणून जाणवत आहे.

संपूर्ण हवेली तालुका म्हणून पंचायत समिती, जिल्हा बॅक निवडणूक, बाजार समिती निवडणूक, इतकाच संबंध तालुका तालुक्याच्या नेतृत्वाशी येत आहे. अशातच लोकप्रतिनिधी भिन्न असलेल्या मर्यादीत भागाचा विचार इतकीच दूरदृष्टी नेतेमंडळींची झाली आहे. त्यामुळे पोलिस ,महसूल खात्याच्या रचनेचा वारंवार त्रास जनता सहन करीत आहे. पोलिस दलातील विभागणीची त्रुटी ग्रामीण जनतेला त्रास भर घालीत आहे.

हवेली तालुक्याचा विचार करता १९९४ ला पूर्वीचा पिंपरी चिंचवड व ग्रामीण भाग म्हणून हवेली विधानसभा मतदारसंघ हा अस्तित्वात होता.त्यावेळी तालुक्याच आमदारकीचे नेतृत्व शहरी भागाला मिळत होते. मात्र त्यानंतर तेही अस्तित्व गमावले असून तालुका पूर्व व पश्चिम ,दक्षिण, उत्तर विभागल्याने तालुक्याला नेतृत्वाची संधी उरली नाही. हवेलीत आता केवळ शिरुरला जोडलेल्या तालुक्याचा सर्वात जास्त भाग नेतृत्वाची संधी शोधत असून तालुक्याला एक नवे नेतृत्व मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.

तालुक्यात तगडे इच्छुक विधानसभेच्या निवडणुकीत लंगोट बांधून तयार आहे. त्यातून तालुका आपले नेतृत्व हवं म्हणून चर्चा करु लागली आहे. तालुक्यात सक्षम नेतृत्व नसल्याने तालुका अनेक दशके जिल्ह्यातील नेतृत्वाच्या पाठिमागे फरफट आहे. तालुक्यातील आमदार असेल तर आज तालुक्यात निर्माण झालेले अनेक प्रश्न चुटकीत सोडविण्याची सत्तेच्या पदात ताकद आहे. आज सहकारी साखर कारखाना, तालुक्यात बहुउद्देशीय कंपन्या असून तालुक्यात तरुणांना रोजगार नाही, स्थानिकांना संधी मिळत नाही, वाहतुक कोंडीचा प्रश्न ,भरकटलेला विकासाचा प्रश्न असे कित्येक प्रश्न नेतृत्वाची उणीव असल्याने सुटू शकले नाहीत.

त्यामुळे आता कुरघोडीच्या शापाने कलंक असलेल्या तालुका नेतृत्वाला जनतेनेच स्विकारणे क्रमप्राप्त झाले आहे. विधानसभेची आता ही शेवटची निवडणूक आहे, पुढील विधानसभेला नव्याने मतदारसंघ बदणार आहे. पुढील रचनेत तालुक्याची अवस्था कशी होणार यापेक्षा तालुका यंदा संधी शोधणार काय , ती शोधण्याचा प्रयत्न तालुका करणार काय असा प्रश्न आहे. हवेलीकर आता राजकीय दुबळेपणा दूर करून आमदारकीचे स्वातंत्र्य पूर्व कालखंडापासून अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करणार ,का म्हणून उत्सुकता लागली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!