त्वचेचे सौंदर्य खुलवा तेलाच्या मसाजाने


 

उरुळी कांचन :सुंदर दिसावं असे कोणाला वाटत नाही. अगदी छोट्यांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वानाच आपण सुंदर असावं असच काहीसं वाटतं. त्यामुळे मग सुंदर दिसण्यासाठी अनेक उपाय केले जातात. त्यांपैकी काहींचा इफेक्ट फारच सुंदर असतो. अशीच एक नवी उपचार पद्धती सध्या विकसित झाली आहे. तेलाचा उल्लेख आपण सौंदर्यप्रसाधनांमध्ये क्वचितच करतो. मात्र, तेलाचा जर योग्य पद्धतीने वापर केला तर त्वचेचा पोतही सुधारू शकतो. त्यासाठी एक नवी थेरपी विकसित झालेली आहे. त्याविषयी जाणून घ्या ही माहिती…

 

घरच्याघरी करता येणारी थेरपी

तेलांमध्येही आपल्याला भरपूर प्रकार बघायला मिळतात. मात्र, उत्तम परिणामांसाठी एरंडेल व ऑलिव्ह ऑइलची निवड करावी.

त्वचेच्या प्रकारानुसार कोरडी आणि तेलकट त्वचा असणाऱ्यांनी एक चमचा एरंडेल तेल आणि ३ चमचे ऑलिव्ह ऑइल एकत्र करावं, तर नॉर्मल त्वचा असणाऱ्यांनी ऑलिव्ह आणि एरंडेल तेलाचा वापर प्रत्येकी दोन चमचे करावा. एकत्र केलेले तेल त्वचेवर हळुवारपणे लावावं व नंतर पाच मिनिटं मसाज करावा. कपड्याचा एक तुकडा गरम पाण्यात बुडवून तो पिळून घ्यावा. म्हणजे कपड्यातील अतिरिक्त पाणी निघून जाईल. आता तो कपडा चेहऱ्यावर पसरावा. एक ते दोन मिनिटांसाठी कपड चेहऱ्यावर तसाच राहू द्यावा. म्हणजे त्या कपड्यातील गरम वाफ चेहऱ्याला नीट व्यवस्थित लागते. त्या कपड्याला लागलेलं अतिरिक्त तेल पिळून टाकावं. नंतर चेहऱ्यावरचं तेलही पुसून काढावं. गरज पडल्यास चेहरा पाण्याने धुवावा.
अशा प्रकारे चेहऱ्याचं मॉइश्चरायझर नीट व्यवस्थित टिकून राहण्यास मदत होते. तिचा पीएचही बॅलन्स राहतो. ही प्रक्रिया शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी करावी. म्हणजे सकाळपर्यंत आपल्या त्वचेचा पोत सुधारून ती चमकदार होते.

 

फायदे : त्वचेतील ओलावा वाढण्यास मदत होते. तिचा पीएच बॅलन्स झाल्याने त्वचा उजळते. ब्लॅकहेड्स, छिद्रांमधली घाण आणि चेहऱ्यावरचं अतिरिक्त तेल निघून जातं. कोरड्या त्वचेचं तेलामुळे पोषण होतं. त्वचेचा पोत सर्वत्र सारखा बनतो.

चेहऱ्याला दररोज तेलाने मसाज केल्याने त्वचेचं रक्ताभिसरण सुधारतं. त्वचेच्या पेशी बळकट बनतात. मृत पेशी चटकन काढून टाकता येतात. उत्तम फेसपॅक म्हणूनही ही थेरपी तुम्ही वापरू शकता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!