Maharashtra Election 2024 : महायुतीचा विधानसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागा लढवणार?, जाणून घ्या..
Maharashtra Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने महायुतीच्या जागा वाटपाचे सूत्र ( फॉर्म्युला) तयार केला असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप १५० पेक्षा अधिक जागा लढविणार असून अजित पवार गटाला ६० आणि एकनाथ शिंदे गटाला ७० जागा देण्यात येणार आहे. अशी माहिती समोर आली आहे.
नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या चर्चेतून हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. या जागा वाटपात झाल्याच तर चार- पाच जागा मागेपुढे होतील, अशी माहिती दिली आहे.
भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याकडील विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या गटाला सोडल्या जातील. मात्र काही जागा याला अपवादही ठरतील, अशीही माहिती समोर आली आहे. Maharashtra Election 2024
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले तेव्हा भाजपच्या नेत्यांनी त्यांना विधानसभेच्या ९० जागा देण्याचा शब्द दिला होता. परंतु त्यांना जास्त जागा देवून जोखीम उठविण्यासाठी भाजपचे नेतृत्व तयार नाही. अजित पवार गटाच्या वाट्याला ६० च्या आसपास जागा येतील. यात विद्यमान आमदार आणि काही अपक्ष आमदारही आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी १०० जागांची मागणी केली होती, पण त्यांच्या वाट्याला ७० च्या आसपास जागा येतील. शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीतल्या जिंकलेल्या जागांचे गणित भाजपच्या नेतृत्वापुढे मांडले. तसेच शिंदे यांच्याकडे उमेदवारही नाहीत. त्यामुळे ७० जागांची लक्ष्मणरेखा भाजपने त्यांच्यासाठी आखली आहे.