Pune Crime : तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं! मृत महिलेसह तिच्या दोन्ही जिवंत लेकरांना नदीत फेकलं..

Pune Crime : तिहेरी हत्याकांडच्या घटनेने पुण्यातील मावळ तालुका हादरला आहे. महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह नदीत टाकत असताना आरडाओरडा करणाऱ्या तिच्या दोन लेकरांनाही आरोपींनी नदीत ढकलल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ही घटना दिनांक ६ ते ९ जुलै २०२४ रोजी घडली. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना अटक आहे. बेपत्ता असलेल्या महिलेच्या शोधादरम्यान या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात विवाहित महिला बेपत्ता असल्याची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केला.

या तपासात बेपत्ता महिलेच्या प्रियकराने तिचा गर्भपात करण्यासाठी तिला आपल्या मित्रासोबत ठाणे येथे पाठविले होते. ठाण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. Pune Crime

त्यानंतर प्रियकराच्या मित्राने मृत महिलेला आणि तिच्या दोन्ही मुलांना परत घेऊन येत असताना तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास प्रियकराने आणि त्याच्या मित्राने मदतीने महिलेचा मृतदेह नदीत फेकून दिला.
या प्रकारांमुळे दोन्ही मुलांनी टाहो फोडला. यावेळी आरोपींनी मुलं रडतात म्हणून त्यांनाही जिवंतपणे नदीत ढकलले. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास तळेगांव एमआयडीसी पोलीस करीत