Gold Prices : सोन्याच्या दरात वाढ सुरूच, सलग सहाव्या दिवशी देखील सोन्याच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या…

Gold Prices : सगल सहाव्या दिवशीही सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. नवी देशांतर्गत मागणी आणि रुपयाच्या विनिमय दरातील घसरणीमुळे गुरुवारी सराफा बाजारात सोने ७०० रुपयांनी वाढून ७६,४०० रुपये प्रति १० ग्रॅम झाले.
सलग सहाव्या सत्रात सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. तर चांदीच्या दरात घसरण पाहिला मिळाली. चांदीचे दर ४००० रुपयांनी घसरून ९४,००० रुपये प्रति किलो झाला.राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव ७०० रुपयांनी वाढून ७६,४०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव ७५० रुपयांनी वाढून ७६,१०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. चांदीचा भाव ४०० रुपयांनी घसरून ९४,००० रुपये प्रति किलो झाला, जो दराच्या तुलनेत कमी आहे. स्थानिक ज्वेलर्सच्या सततच्या खरेदीमुळे सोन्याचे भाव वाढल्याचे सांगण्यात आले आहे. Gold Prices


दरम्यान, याशिवाय, रुपया सहा पैशांनी घसरून ८३.६४ रुपये प्रति डॉलर या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाला. परदेशी बाजारात कॉमेक्सवर सोन्याची किंमत प्रति औंस $ 6.90 ने वाढून $ 2,466.80 प्रति औंस झाली.
पुण्यात सध्या १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ७३,८८० रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत थोड्याशा फरकाने जास्त होताना दिसत आहे. १० ग्रॅम २२कॅरेट सोन्याचे दर ६८,३८० रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो ९२,८१० रुपयांवर गेले आहेत.