Ladki Bahin Yojana 2024 : आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय! आता ऑफलाईन पद्धतीनेही…

Ladki Bahin Yojana 2024 : महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे. त्यामुळे महिलांसाठी ही योजना मोठी मदतगार होणार आहे.
या योजनेची नोंदणी आता ३१ ऑगस्टपर्यंत सुरु करण्याची मुदतवाढ दिली आहे. या योजनेसाठी अनेक अटींना सरकारने शिथील केले आहे. अडीच लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्नाची अट देखील सरकारने काढली आहे.

आता केवळ रेशनिंग कार्ड दाखविले तरी पुरेसे ठरणार आहे. तसेच आता आणखी एक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांची चिंता दूर होणार आहे.


मध्य प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. Ladki Bahin Yojana 2024
या योजनेसाठी ३१ ऑगस्टची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मात्र या योजनेसाठी राज्य सरकारने एक वेबसाईट आणि मोबाईल ॲप्स तयार केले आहे. मात्र वेबसाईट आणि मोबाईल ॲप्सवर अर्ज भरताना अडचणी होत आहे.
दरम्यान, या योजनेची वेबसाईट सुरळीत सुरू नसली तरी ऑफलाईन पद्धतीने ३१ ऑगस्टपर्यंत आलेले सर्व अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी म्हटले आहे.
महिलांसाठी चांगली योजना राबवली असून या योजनेतून कुठलीही महिला वंचित राहणार नाही, त्यामुळे ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज स्वीकारले जाणार असल्याने याचा फायदा महिलांना होणार आहे.