Ajit Pawar : आता महिलांना मिळणार वर्षांला 3 गॅस सिलेंडरचे पैसे, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती…


Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. अजित पवार यांनी या अर्थसंकल्पातून अनेक मोठ्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरची देखील घोषणा करण्यात आली.

राज्यात गॅस सिलेंडरचा दराचा विषय नेहमीच चर्चेत येत असतो. अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. सध्या या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

एक जुलैपासून या योजने करिता अर्ज सादर करण्यास सुरुवात झाली असून ३१ ऑगस्ट पर्यंत महिलांना अर्ज सादर करता येणार आहे. अर्थातच एक जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये म्हणजेच वार्षिक १८ हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. Ajit Pawar

राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या, निराधार महिलांना या अंतर्गत हा लाभ मिळणार आहे. अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसोबतच अन्नपूर्णा योजनेची देखील घोषणा करण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. या अंतर्गत एका वर्षात राज्यातील पात्र महिलांना तीन गॅस सिलेंडरचे पैसे दिले जाणार आहेत. Ajit Pawar

दरम्यान, आता याच योजने संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मोठी माहिती दिली आहे. काल अर्थातच रविवारी अजित पवार यांनी बारामती येथे एका सभेत बोलतांना या योजनेबाबत मोठी माहिती दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत की, लाडकी बहिण योजनेवरचं आम्ही थांबलेलो नाही. आमच्या सर्व बहिणी, माता आणि मुली यांच्यासाठी आता आम्ही एका वर्षात तीन एलपीजी गॅस सिलेंडर साठी पैसे देणार आहोत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे, ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना सरकार एका वर्षात तीन एलपीजी गॅस सिलेंडरसाठी पैसे देणार आहे. नक्कीच, यामुळे महागाईने बेजार झालेल्या राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!