Pune Crime : धक्कादायक! जेवणाची चव बिघडवल्याने कूकचा केला खून अन्…; भयंकर घटनेने सगळेच हादरले


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

पुण्यात क्षुल्लक कारणामुळे कूक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेवणाची चव बिघडवल्याने कूकचा उंड्रीमध्ये खून केल्याची माहिती समोर आली आहे. Pune Crime

कूकच्या नाकावर आणि डोक्यावरती हातोड्याने वार करून खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या खून प्रकरणात कोंढवा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

शुभम शास्त्री सरकार (वय ६३, रा. पश्चिम बंगाल) असे खून झालेल्या कूकचे नाव आहे. कमल नारायण मार्डी (वय ४८, पश्चिम बंगाल) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, कॅम्पमधील कॅन्टीनमध्ये कूक म्हणून काम करणाऱ्या शुभम शास्त्री सरकार नावाच्या कूकच्या नाकावर व डोक्यात हातोड्याने वार करून त्याचा खून केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर हल्ला झालेल्या कूकला रुग्णालयात हलवण्यात आले.

मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्या असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. याप्रकरणात कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!