Earthquake in Maharashtra : मराठवाडा, विदर्भातील जिल्हे भूकंपाने हादरले! परभणी, हिंगोली, नांदेडसह वाशीममध्ये भूकंपाचे धक्के…

Earthquake in Maharashtra : राज्यात विदर्भ आणि मारठवड्यातील काही जिल्ह्यात आज सकाळच्या सुमारास भूकंप झाला. अचानक जमिनीतून गूढ आवाज येऊन भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे हे धक्के मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड तर विदर्भातील वाशीम जिल्ह्यात जाणवले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मराठवाडा जिल्ह्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या तीन तर विदर्भातील वाशीम या एका जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण प्रात:काळी बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे काही काळासाठी लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
या घटनेचे वृत्त असे की, आज सकाळी पहाटेच्या सुमारास मारठवडा आणि परभणी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले. सकाळी ६ ते ७ च्या सुमारास हे धक्के जाणवले. परभणी येथे सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी तर जिल्ह्यातील सेलू, गंगाखेड भगत देखील भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अचानक आलेल्या भूकंपामुळे व जमीन हादरल्याने नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. Earthquake in Maharashtra
परभणी शहर, सेलू, गंगाखेड आदी भागात भुकंपाचा हा धक्का जाणवला आहे. अचानकपणे जमीन हादरल्याने अनेक ठिकाणी लोक भयभीत होऊन घराबाहेर आले. मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाचा हा धक्का ४.२ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा होता.