Vasant More : वसंत मोरेंच पक्क ठरलं! हातात भगवे झेंडे, गाड्यांचा मोठा ताफा, आज ठाकरेंची मशाल हाती घेणार..


Vasant More : पुणे लोकसभेची निवडणूक वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. यानंतर वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज वसंत मोरे हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

गाड्यांचा मोठा ताफा, हातात भगवे झेंडे घेत पुण्याचे वसंत मोरे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मातोश्री येथे आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वसंत मोरेंचा ठाकरे गटात प्रवेश होणार आहे. वसंत मोरे हे पुण्यातून जंगी शक्तीप्रदर्शन करत मुंबईकडे मार्गस्थ झाले आहेत. Vasant More

आज दुपारी मातोश्री या ठिकाणी वसंत मोरे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित होणार आहे. वसंत मोरे या आधी मनसे आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी महाविकास आघाडीतून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते.

मात्र उमेदवारी न मिळाल्याने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घेतली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटात वसंत मोरे प्रवेश करत असल्याची माहिती मिळत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!