Vidhanparishad Election 2024 : विधान परिषद निवडणूक अखेर होणार, ११ जागांसाठी १२ उमेदवार, एकाचा होणार पराभव…


Vidhanparishad Election 2024 : राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यामध्ये ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्याने चुरस वाढली आहे. एकाच पराभव होणार असून कोणाचा पराभव होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषद निवडणुकीत महायुती आपला उमेदवार मागे घेणार नसल्याने महाविकास आघाडी कोणती भूमिका घेणार? याची चर्चा रंगली आहे. विधानपरिषद निवडणुकीत शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत दोन जागा जिंकून उद्धव ठाकरेंनी मोठा डाव खेळला आहे.

यामुळे सध्या भाजप देखील सावध भूमिका घेत आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवले आहे. नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे ‘मॅन फ्रायडे’ मानले जातात.

नार्वेकर यांच्या उमेदवारीमुळे महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस मतदान देखील होण्याची शक्यता आहे. नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांच्याबाबत देखील त्यांचे चांगले संबंध आहेत.

दरम्यान, नार्वेकर यांच्या उमेदवारीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून क्रॉस व्होटिंग होऊ शकते. नार्वेकर ही सर्व आमदारांच्या जवळची व्यक्ती आहे. यामुळे आता मतदानाकडे लक्ष लागले आहे. Vidhanparishad Election 2024

दरम्यान, नार्वेकर हे गेल्या दोन दशकांपासून उद्धव ठाकरेंचे पीए म्हणून कार्यरत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे एकूण १५ मते आहेत. विजयासाठी 23 मतांची गरज आहे. यामुळे गणित कस जुळणार हे लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!