Crime News : चोरट्यांनी केली प्रामाणिकपणे चोरी, चोरीनंतर घरमालकाला दिली पैसे परत करण्याची लेखी हमी, नेमकं काय घडलं? जाणून घ्या..


Crime News : आपल्या आसपास चोरी, दरोड्याच्या घटना घडत असतात.अशातच आता तामिळनाडूमध्ये चोरीचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. तुतीकोरीन जिल्ह्यातील एका घरात चोरी झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

याठिकाणी रोख रक्कम व दागिने गायब असल्याचे आढळून आले. मात्र, रिपोर्टनुसार या संपूर्ण घटनेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चोराची चिठ्ठी. ही चोरीची घटना ७९ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक चिथिराई सेल्विन यांच्या घरी घडली आहे. सेवानिवृत्त शिक्षक सेल्विन यांच्या कुटूंबात पत्नी आणि चार मुले आहेत.

चेन्नईतील आपल्या मुलाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी हे जोडपे १७ जून रोजी घराबाहेर पडले होते. मंगळवारी रात्री मोलकरीण घरी पोहोचली तेव्हा घराचे गेट उघडे पाहून तिला धक्काच बसला. घरात कोणीतरी शिरल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिने ताबडतोब मालक व पोलिसांना बोलावले. Crime News

चोरट्याने ६० हजारांची रोकड, दोन जोड सोन्याचे कानातले आणि चांदीचे पैंजण असा ऐवज पळवून नेल्याचे पोलिसांनी सांगितले. मला माफ करा अशी चिठ्ठीही चोरट्याने ठेवली आहे.

मी ते एका महिन्यात परत करीन. माझ्या घरात कोणीतरी आजारी आहे. म्हणूनच मी हे करत आहे. मेघनापुरम पोलिसांनी चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेची आता सगळीकडे चर्चा सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!