Nashik News : शाळेत चक्कर येऊन पडल्यानं सहावीतील विद्यार्थीनीचा मृत्यू, नाशिकमधील घटनेने खळबळ…

Nashik News : एका शाळेत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या अकरा वर्षाच्या मुलीचा वर्गातच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना नाशिकच्या सिडको परिसरातून समोर आली आहे. ही विद्यार्थिनी सहाव्या वर्गात शिकत होती.
चक्कर येऊन बेंचवरून खाली पडल्यामुळे या मुलीचा मृत्यू झालाय. शाळेतच अचानक मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलीचा मृत्यू कसा झाला. याबाबत कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
सविस्तर माहिती अशी की, सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षीय मुलीचा वर्गातच मृत्यू झाल्याने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नाशिकच्या सिडको परिसरातील एका शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. Nashik News
शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी दिव्या नेहमीप्रमाणे शाळेत आली होती. शाळेमध्ये अचानक चक्कर आल्याने ती बेंचवरून खाली पडली. या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दरम्यान, मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याबाबतचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेनंतर मुलीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. तसेच पोलिसही जिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून याबाबतचा अधिक तपास सुरू आहे.